विराट कोहलीला करोनाची बाधा

तब्येतीत सुधारणा : बीसीसीआयची माहिती


23rd June 2022, 12:37 am
विराट कोहलीला करोनाची बाधा

विराट कोहली
लंडन : कसोटी सामन्यापासून भारताच्या इंग्लंड दौऱ्याला सुरुवात होत आहे. १ जुलैपासून एजबॅस्टनमध्ये भारत आणि इंग्लंडमध्ये कसोटी सामना सुरू होणार आहे. मात्र, त्याआधी टीम इंडियाचा मुख्य फलंदाज विराट कोहली करोनाची लागण झाली आहे. मात्र, आता त्याच्या तब्बेतीत सुधारणा असल्याचे बीसीसीआयने सांगितले आहे. मालदीव सुटट्यांवरून परतल्यानंतर विराटला करोनाची लागण झाली. 
याआधी भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विनलाही करोनाची लागण झाली होती. यामुळे कोविड पॉझिटिव्ह असल्याने अश्विन भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर जाऊ शकला नाही. मात्र, तो आता बरा असून सराव सामन्यापूर्वी तो लिसेस्टरला पोहोचेल, अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, पुढील महिन्यात बर्मिंगहॅम येथे भारत आणि इंग्‍लंड यांच्‍यात कसोटी हाेणार आहे. त्‍याआधी भारतीय संघ २४ जून पासून ‌लिसेस्‍टर काउंटी संघाविरुध्द सराव सामना खेळणार आहेत. दरम्‍यान, अश्विन आणि विराटचा करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्‍याने या सामन्यावरही त्‍याचा परिणाम होणार आहे.
मालदीवमधून सुट्टी घालवून परतल्यानंतर विराटला करोनाची लागण झाली आहे. मालदीवमधून परतल्यानंतर कोहली थेट हॉस्पिटलमध्ये गेला होता. अलीकडेच लिसेस्टरला पोहोचल्यानंतर कोहली काही चाहत्यांसोबत सेल्फी घेतानाही दिसला होता.

इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला करोना झाल्याचे वृत्त झळकताच क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र, यावर भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) ने मोठी अपडेट्स दिली आहे. विराट कोहलीला करोनाची लागण झाली होती, ही माहिती खरी आहे. परंतु, तो आता बरा झाल्याचे बीसीसीआयने म्हटले आहे. त्यामुळे चाहत्यांसह टीम इंडियालाही दिलासा मिळाला आहे. दरम्यान, भारतीय संघ २४ जूनपासून लिसेस्टर काउंटी संघाविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. या सामन्यात विराट कोहली खेळण्याची शक्यता आहे.