योग ऑलिम्पियाडमध्ये गोव्याच्या पथकाला रौप्यपदक

|
20th June 2022, 10:12 Hrs
योग ऑलिम्पियाडमध्ये गोव्याच्या पथकाला रौप्यपदक

पणजी : गोव्याचे राष्ट्रीय योग ऑलिम्पियाडमध्ये प्रतिनिधीत्व करण्यासाठी क्रीडा आणि युवा व्यवहार संचालनालयातर्फे ४ मुले व ४ मुलींच्या संघाची निवड करण्यात आली होती. या संघाने रौप्य पदकाची कमाई केली आहे. ही योग ऑलिम्पियाड १८ ते २२ जून दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली असून एनसीईआरटीतर्फे याचे आयोजन करण्यात आले आहे. यशस्वी संघात याशिका चेवली, मनस्वी पास, इमा पाटील, शिवम देसाई यांनी शानदार प्रदर्शन केले. या संघासोबत प्रशिक्षक विशाल गवस व व्यवस्थापक जया पाटील उपस्थित होते.