चटपटीत कॉर्न व्हेज कोशिंबीर

Story: अन्नपूर्णा | स्वप्ना नाईक |
13th May 2022, 09:46 pm
चटपटीत कॉर्न व्हेज कोशिंबीर

इतर भाज्यांपैकी व्हिटॅमिन 'सी'ने  समृद्ध असलेले कॉर्न म्हणजेच मके हे दैनंदिन आहारात पौष्टिक, पूरक व त्यासोबत असलेल्या भाज्या ह्या नैसर्गिक मार्गाने प्रथिनांचे एक उत्तम स्रोत बनवते. कॉर्न व्हेज सॅलड तुमच्या चवीनुसार आणि आवडीनुसार तुम्ही बनवू शकता. 

साहित्य :

१ कप कॉर्न कर्नल

१/४ कप प्रत्येक काकडी, लाल सिमला मिरची, हिरवी सिमला मिरची, कांदा, टोमॅटो सर्व बारीक चिरून

१/२ टीस्पून काळे मीठ

१/२ टीस्पून ठेचलेली काळी 

मिरी

१ टीस्पून लिंबाचा रस

चिरलेली कोथिंबीर

कृती: 

मीठ न घालता कॉर्न उकळवा, थंड झाल्यावर नॉर्मल तपमानावर थंड होऊ द्या. त्यानंतर.बाकीचे सर्व साहित्य घालून मिक्स करून सर्व्ह करा. हे तासनतास तितकेच चविष्ट राहते. त्याशिवाय यात तेल आणि पांढर्‍या मिठाचा वापर नसल्याने हे आरोग्यदायक असे असते. 

घरातल्या सर्वांनाच आवडेल असे एक रंगीबीरंगी निरोगी सॅलड नक्कीच करून पहा.