डिजिटल हेल्थकेअर प्रॉडक्ट्स आणि ॲप्स जे वाचवू शकतील तुमचा पैसा, जीव अन् बरेच काही

करोनानंतर जग खूप बदललं आहे, त्याच रीतीने बदलल्या आहेत आपल्या शरीराच्या गरजा. आत्ताच कुठे सगळे सावरू लागले आहे, त्यात आपली इम्युनिटी अन् तत्सम गोष्टी हा खूप महत्त्वाचा भाग आहे.

Story: टेक्नो जगतात | ऋषभ एकावडे |
07th May 2022, 11:41 pm
डिजिटल हेल्थकेअर प्रॉडक्ट्स आणि ॲप्स जे वाचवू शकतील तुमचा पैसा, जीव अन् बरेच काही

इकॉनॉमी व त्यासोबत जोडले गेलेले घटक आज ना उद्या सावरले जातीलच, पण एकदा का आपला फिटनेस अन् इम्युनिटी जर शरीर सोडून गेले तर मात्र काही खरे नाही. व्यायाम आणि खुराक हे दोन घटक आपले शरीर सशक्त ठेवण्यात खूप मदत करतात. ह्याच जाणिवेतून मी आज घेऊन आलो आहे 

टॉप ०९ Free / paid  subscription/  in- app  purchase  फिटनेस ॲप्स

जे तुम्ही तुमच्या गरजेनुरुप वापरू शकता.

सर्वात बेस्ट: MyFitnessPal

बेस्ट बजेट ॲप: Daily workout fitness Trainer

बेस्ट फॉर Apple  Watch:  Zones for Training

बेस्ट फॉर monitoring  nutrition: Fooducate

बेस्ट फॉर yoga:  Glo

बेस्ट फॉर beginners: Sworkit

बेस्ट फॉर meditation: Headspace

बेस्ट फॉर quick  workouts: The 7 minute  workout

बेस्ट trainer-in-your-pocket:PEAR Personal Fitness

चला सुरू करू


बेस्ट Overall App: MYFitnessPal App

काही ठळक वैशिष्ट्ये: 

मोफत डाऊनलोड करून वापरू शकता. सबस्क्रिप्शन १०$ प्रती माह  किंवा ७६० रुपये प्रती माह.( बाकी फिटनेस ॲप्स ह्याच रेंजमध्ये चार्ज करतात).

अँड्रॉइड व IOS वर उपलब्ध. 

Calories अन् फिटनेस ट्रॅक करता येतात. ५० पेक्षा जास्त ॲप्स व उपकरणे तुम्ही सोबत कनेक्ट करू शकता.

हेच ॲप का निवडले?

११ मिलियन डाएट प्लॅन्स/ बाकी ॲप्स व उपकरणांसमवेत  आरामात जुळवून घेते/ आहार आणि फिजिकल ॲक्टिव्हिटीची नोंद ठेवते/ ३५० + वर्कआऊट अक्टिव्हिटीज  उपलब्ध.

हे ॲप बरेच उपायकारक आहे. रिव्ह्यूज देणारेसुद्धा खरोखरचे वापरकर्ते आहेत.ज्यांना सगळेच काही करायचे आहे त्यासाठी हे ॲप एक मेजवानीच आहे. ह्यात डाएट प्लॅन ट्रेकिंग ते फिटनेस / वजन / cardio  अन् तत्सम गोष्टी आपण उपभोगू शकतो.

बेस्ट बजेट ॲप: Daily workout fitness Trainer

काही ठळक वैशिष्ठ्ये:

 किंमत: मोफत डाऊनलोड आणि वापर. सबस्क्रिप्शन १०$ प्रती माह. 

अँड्रॉइड व  IOS. 

व्यायामाचे व्हिडिओज, ५ ते ३० मिनिट वर्कआउट, रूटीन/abs/cardio व ओन स्क्रीन मार्गदर्शन व टाईमर.

हेच ॲप का निवडले? 

ह्यात बजेट फ्रेंडली व करण्यास सोप्पे असे वर्कआऊट रूटीन आहे जे तुम्हाला मॅक्सीमम रिझल्ट देईल.

certified  trainer नी develop केलेय. घरी करता येण्याजोगे व्यायाम. मूलभूत सेवेसाठी काही शुल्क नाही. Begginers साठी सूट. गरजेनुसार वर्कआऊटची वेळ ठरवता येते.

वर्कआऊटमध्ये खूप संतुलन आहे. हार्ड वर्कआऊट एवढा की फॅट्स आणि carbsची चिंता उरणार नाही अन् सोप्पे एवढे की करताना जास्त त्रास जाणवणार नाही.

बेस्ट फॉर मॉनिटरिंग नुट्रीशन:Fooducate

काही ठळक वैशिष्ट्ये:

मोफत डाऊनलोड अन् वापर, $२ ते $५० प्रती अपडेट्स किंवा ADD-ON  सर्व्हिसेस साठी.

 अँड्रॉइड अन् IOS.

फूड एज्युकेशन / बारकोड स्कॅनर / फूड ट्रॅकर / डाएट टिप्स अन् रेसिपीज / कॉमूनिटी बेस्ड सपोर्ट इत्यादी.

हेच ॲप का निवडले? 

वापरास सोप्पे. Micronutrient ratios  हे सोप्प्या पद्धतीने चार्ट्सद्वारे मांडले जातात / तुमच्या प्रोटीन, carb, लोह/ झिंक / कल्शियम सारख्या nutrientsची नोंद ठेवतो. ह्यातले pie-charts वापरून तुम्ही तुमचे रोजचे कॅलरी / nutrients सेवनाचे प्लॅनिंग करू शकता.

आज ह्या भागात येथेच थांबू. पुढील भागात आपण जाणून घेऊया बाकी उरलेल्या काही मोस्ट desired ॲप्सबद्दल.

बेस्ट फॉर apple वॉच: Zones for Training

काही ठळक वैशिष्ट्ये: मोफत डाऊनलोड व वापर/ $६ प्रोमध्ये अपग्रेड करण्याकरीता.

अँड्रॉइड व IOS उपलब्ध. हार्ट रेट  मॉनिटरिंग / हार्ट रेट  ट्रेनिंग झोन / हार्ट रेट ट्रेकिंग cardioकरिता आणि strength - training  करिता.

हेच ॲप का निवडले?: अनुभवी फिटनेस enthusiastsना अपील करते. किती फॅट्स बर्न झाले याची माहिती पुरवली जाते. ऍपल वॉचबरोबर आरामात जुळून घेतो. मूलभूत सेव्हसाठी काहीच शुल्क आकारले जात नाहीत. फक्त अशांसाठी अजिबात नाही हे ॲप जे  medications घेतात हार्ट रेट नॉर्मल ठेवण्याकरिता.