राज्यात २४ तासांत कोविडचे ९ बळी

बाधित मिळण्याचे प्रमाण ४०.८६ टक्के

|
20th January 2022, 11:52 Hrs
राज्यात २४ तासांत कोविडचे ९ बळी

पणजी : राज्यात गुरुवारी २४ तासांत ९ बाधितांचा मृत्यू झाला. यांपैकी ७ जणांनी कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेतलेले नव्हते. गुरुवारी ८,२९५ चाचण्या करण्यात आल्या. ३,३९० बाधित आढळले. बाधित मिळण्याचे प्रमाण ४०.८६ टक्के झाले आहे. तिसरी लाट सुरू झाल्यापासून प्रथमच २४ तासांत ९ बळी गेले आहेत. राज्यातील एकूण करोनाबळींची संख्या ३,५८५ झाली आहे.

गुरुवारी ९ जणांचा मृत्यू झालेल्यांमध्ये बाणावली (५६, महिला), कळंंगुट (६७), चिखली (८५, महिला), असोल्णा (५७, महिला), जुआरीनगर (४७), काणकोण (७७, महिला), फोंडा (७९, महिला), मडगाव (७३), करंजाळे (८१, महिला) येथील बाधितांचा समावेश आहे. गुरुवारी ३,७२८ बाधितांनी करोनावर मात केली. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८८.२९ टक्के आहे. करोना प्रतिबंधक लस घेतलेल्या व्यक्तींना करोनाची बाधा होते, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक होत नाही. लस न घेतलेल्यांसाठी मात्र ही कोविडची तिसरी लाट धोकादायक ठरत आहे.