एपीयू, सीपीयू व जीपीयू

Story: टेक्नो जगतात | ऋषभ एकावडे |
16th January 2022, 12:54 Hrs
एपीयू, सीपीयू व जीपीयू

तुम्हाला फायदेशीर असा लॅपटॉप घ्यायचा असेल तर परत २ ते ३ पर्याय असतात की प्रोसेसर कोणता असावा, त्यात थ्रेड व कोअर किती असावे, जीपीयू असावा का? अन् असला तर कोणता असावा ? अन् जीपीयू महाग पडला तर त्यास काय पर्याय? हे एपीयू म्हणजे काय?

जेव्हा तुम्हाला नव्या लॅपटॉप किंवा डेस्कटॉपची गरज भासते तेव्हा तुमच्या समोर २ ते ३ पर्याय असतात...

CPU ( Central processing Unit )

हा कोणत्याही संगणकाचा मेंदू असतो. आधी सीपीयू हे बऱ्याच चिप्समध्ये बसवलेले असायचे. पुढे त्याचा वेग वाढण्यासाठी व प्रोडक्शन कोस्ट कमी करण्यासाठी आजकाल सीपीयू  हे सिंगल कोर मध्येच बनवलेले असतात. ह्याच सीपीयूच्या सुधारित आवृत्तीस मायक्रो प्रोसेसर म्हणतात.

सीपीयू हा मूलभूत कम्प्युटिंग करतो, दिले गेलेले निर्देश हे ram मध्ये साठवून त्यास cpu कडे अंमलबजावणी करिता पाठविले जाते व त्यामध्ये Fetch, Decode & Execute हया पायऱ्या असतात. ह्याच आधारे एक्सेल शिट मधले फॉर्म्युला काम करतात.

सीपीयू बहुआयामी स्वरूपात मिळतात, ऊर्जा बचत करणारी चीप म्हणजे सिंगल कोर किंवा अभूतपूर्व परफॉर्म करणारी ऑक्टा कोर चीप.

GPU ( GRAPHIC PROCESSING UNIT )

भलेही सीपीयू ऑक्टा कोर का असेना तो जीपीयूची कमी भरून नाही काढू शकत. सीपीयू  छोट्या छोट्या इंपुट्स वर काम करतो, पण ग्राफिक्ससाठी बहुआयामी कार्य करावे लागते व ते पार पाडण्यासाठी जीपीयूची गरज भासते. जीपीयू हा सीपीयूचा ताण कमी करून  स्क्रीनवर व्हिडिओचे उत्तमरित्या प्रक्षेपण करतो. आता सगळ्याच लॅपटॉपमध्ये जीपीयू असतातच असे नाही, बऱ्याचदा एंट्री लेव्हल लॅपटॉप्समध्ये इंटेग्रेटेड जीपीयू प्रॉसेसिंग ह्या रचनेवर आधारित असतो. अब्ज, खर्वची गणिते तो सेकंदात करीत असल्याने गेमिंग व व्हिडिओ प्लेबॅकसाठी उत्तम पर्याय ठरतो. मुख्य म्हणजे जीपीयूकडे स्वतः ची RAM असल्याने तो उपयुक्त पद्धतीने परफॉर्म करतो व ह्यामुळे जो डेटा प्रोसेस होतो तो तेथेच बफरमध्ये राहतो व त्या डेटामधल्या व्हिडिओ इमेजचे प्रक्षेपण कमांड दिल्यानंतर होते. डेस्कटॉपमध्ये ग्राफिक कार्ड्सविना जागा बदलता येतात, जरी महाग असले तरी आपल्या गरजेनुसार ते खरेदी करण्याची मुभा आहे हे विशेष. मार्केटमध्ये सर्वांसाठी काही ना काही आहेच.

APU ( ACCELERATED PROCESSING UNIT )

यामध्ये सगळे सीपीयू व जीपीयूचे कोम्पोंनंट्स हे एकाच खोबणीत बसवलेले असते. यामुळे वायफळ प्रोडक्शन कॉस्ट कमी होतो व मुख्य म्हणजे उपभोक्तादेखील कमी किंमतीत उच्च दर्जाचे संसाधन मिळाल्यामुळे समाधान पावतो.

सीपीयू, जीपीयू  हे एकाच खोबणीत बसविल्यामुळे डेटा ट्रान्सफर जोरकस होते. जीपीयू जोरदार आकडेमोडीसाठीच बनवलेला असतो. सीपीयू त्यास आपले काम देऊ शकतो. जरी एपीयू  हा डेडीकेटेड ग्राफिक्ससारखा परफॉर्म नाही करू शकला, तरी तो इंटिग्रेटेड ग्राफिक्सपेक्षा कैक पटीने चांगला आहे व किफायतशीर सुद्धा. 

२००९ साली जरी एएमडीने ह्या एपीयूची सुरुवात केली असली, तरी त्यांची मक्तेदारी नाही काही! इंटेलकडेही एपीयू आहेत पण एएमडीची बातच न्यारी.

(टीप: प्रोसेसरमध्ये बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या आहेत. मुख्य म्हणजे आपली गरज! वेगळा GPU अन् CPU घेण्यापेक्षा त्याच्या निम्म्या किंमतीत APU घेणे केव्हाही चांगले व नेहमी सांगतो त्याप्रमाणे स्वतःचा अभ्यास व सेकंड ओपिनियन जरुरीचे! ते घ्या.)