रात्री ११ पर्यंतच मद्यविक्रीस मुभा

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th January 2022, 11:20 Hrs
रात्री ११ पर्यंतच मद्यविक्रीस मुभा

पणजी : राज्य विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू असेपर्यंत मद्यविक्री करणारी दुकाने, बार, पब, शॅक्स तसेच क्लबना रात्री ११ पर्यंतच दारू विक्री करण्याची मुभा असेल, अशी नोटीस दक्षिण गोवा जिल्हाधिकारी रुचिका कटियाल यांनी शुक्रवारी जारी केली आहे. विधानसभा निवडणूक प्रक्रिया पारदर्शक, शांततेने आणि मोकळ्या वातावरणात पार पडावी, यासाठी मद्य विक्री करणारी दुकाने, बार, पब, शॅक्स तसेच क्लबनी दररोज रात्री ११ पर्यंतच दारूची विक्री करावी. निवडणुकीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकांसह पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवर लक्ष ठेवून असतील, असे नोटिशीत म्हटले आहे.