शिवराम क्रिकेटर्स मये डॅशिंग बॉईज चषकाचा मानकरी

|
11th January 2022, 11:42 Hrs
शिवराम क्रिकेटर्स मये डॅशिंग बॉईज चषकाचा मानकरी

पणजी : पंचायत व नगरपालिका लीग स्पर्धेत शिवराम क्रिकेटर्स मये यांनी शांतादुर्गा क्रिकेटर्स तिवरे यांचा अंतिम सामन्यात पराभव करत विजेतेपद पटकावले. स्पर्धेचे आयोजन डॅशिंग बॉईज ओल्ड गोवा तर्फे करण्यात आले होते.

प्रथम फलंदाजी करताना शांतादुर्गा क्रिकेटर्स तिवरे यांनी ५ षटकांत ६३ धावा केल्या तर शिवराम क्रिकेटर्स यांनी प्रत्युत्तर देताना केवळ ४ षटकांत ६३ धावांचा पल्ला गाठला. 

स्पर्धेत उत्कृष्ट फलंदाज आशिष नाईक (नार्वे), उत्कृष्ट गोलंदाज आकाश गावकर (निवरे), मालिकावीर व अंतिम स्पर्धेचा सामनावीर मयुर ठाणेकर (शिवराम क्रिकेटर्स) यांना प्राप्त झाला.

बक्षीस वितरण समारंभाला सामाजिक कार्यकर्ते रोहन हरमलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजेत्या संघाला रोख ३५ हजार रूपये व आकर्षक करंडक रोहन हरमलकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.