यंदाचा हिवाळा गारठवणार!

पावसाळा संपला असून, यंदाचा हिवाळा सर्वाधिक गारठवणारा ठरणार आहे. तसे हवामान खात्याने संकेत दिले आहेत.

Story: दिल्ली : |
28th October 2021, 12:37 Hrs
यंदाचा हिवाळा गारठवणार!

दिल्ली : पावसाळा संपला असून, यंदाचा हिवाळा सर्वाधिक गारठवणारा ठरणार आहे. तसे हवामान खात्याने संकेत दिले आहेत. प्रशांत महासागरात आकार घेत असलेल्या एल निनोमुळे उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी दरम्यान थंडी वाढणार आहे.दरम्यान, महाराष्ट्रासह देशात किमान तापमानात काही अंशी घट झाली आहे. तर गोवा, कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळू शकतील, असा अंदाजही हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. सध्या बहुतांश ​ठिकाणी दुपारी उकाडा आणि पहाटे थंडी असे संमिश्र वातावरण पाहायला मिळत आहे. बुधवारी पुण्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा १५ अंश सेल्सिअसच्या खाली गेला होता.