अफगाणिस्तानचा सामना आज स्कॉटलंडशी


25th October 2021, 12:08 am
अफगाणिस्तानचा सामना आज स्कॉटलंडशी

शारजाह : अफगाणिस्तानचा क्रिकेट संघ टी-२० विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्धच्या मोहिमेला विजयाने सुरुवात करून कठीण काळातून जात असलेल्यांना अपल्या देशबांधवांना उत्सव साजरा करण्याची संधी देईल अशी आशा बाळगून आहे.
ऑगस्टमध्ये तालिबान्यांनी देश ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानचे लोक कठीण प्रसंगांना सामोरे जात आहेत. घरच्या परिस्थितीमुळे क्रिकेटपटूंना पुरेसा सरावाचा वेळ मिळाला नाही आणि संघ घोषित झाल्यावर स्टार फिरकीपटू राशिद खानने कर्णधारपद सोडल्यावर संघ निवडीवर वाद निर्माण झाला. शेवटच्या क्षणांमध्ये काही बदल करण्यात आले आणि अनुभवी अष्टपैलू महम्मद नबीला पुन्हा संघाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी देण्यात आली.
स्पर्धेच्या सुरुवातीपूर्वी वाद असले तरी अफगाणिस्तानने दोन सराव सामन्यांमध्ये आपली क्षमता दाखवली. संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला पण गतविजेत्या वेस्ट इंडिजचा पराभव केला. अफगाणिस्तान सलामीवीर हजरतुल्लाह झाझाई आणि महम्मद शहजाद यांच्याकडून चांगल्या सुरुवातीची अपेक्षा करेल तर मधल्या फळीत झटपट धावा मिळवण्याची जबाबदारी नजीबुल्लाह झद्रान आणि कर्णधार नबी यांच्यावर असेल.
राशिद, नबी आणि मुजीब जादरानची फिरकी त्रिकूट जगातील सर्वोत्तम फलंदाजांनाही त्रास देण्यास सक्षम आहेत आणि इंडियन प्रीमियर लीग दरम्यान शारजाहच्या संथ खेळपट्ट्या पाहता हे तिघेही विश्वचषक सज्ज खेळपट्टीवर गोलंदाजी करतील अशी अपेक्षा आहे. दुसरीकडे, बांगलादेशसह पहिल्या फेरीच्या तिन्ही सामन्यांमध्ये विजय नोंदवल्यानंतर स्कॉटलंड आत्मविश्वासाने भरलेला आहे.
स्कॉटलंडने बांगलादेशविरूद्ध आपली क्षमता दाखवले आणि पराभवाच्या उंबरठ्यावर असूनही एका मोठ्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला. ब्रॅडली व्हील आणि जोश डेव्ही ही जोडी नवा चेंडू हाताळणार आहे. तर डावखुरा फिरकी गोलंदाज मार्क वॉट मधल्या षटकांमध्ये वर्चस्व गाजवत आहे.