श्रीलंकेत दूधपावडर प्रतिकिलो १,१९५ रुपये; गॅस ९० टक्क्यांनी महागला

श्रीलंका सरकारने अत्यावश्यक वस्तूंवरील दरनियंत्रण हटविल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत.

Story: कोलंबो |
13th October 2021, 12:56 Hrs
श्रीलंकेत दूधपावडर प्रतिकिलो १,१९५ रुपये; गॅस ९० टक्क्यांनी महागला

कोलंबो : श्रीलंका सरकारने अत्यावश्यक वस्तूंवरील दरनियंत्रण हटविल्याने नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. घरगुती सिलिंडरच्या दरात ९० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २५० रुपयांना मिळणारी एक किलो दूध पावडर आता १,१९५ रुपयांना मिळत आहे. या दरवृद्धीने कमालीचा असंतोष पसरला आहे.
राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या अध्यक्षतेखाली मागील गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दरनियंत्रण हटविण्याचा हा निर्णय झाला होता. नियमित घरगुती सिलिंडरचे दर गत शुक्रवारी १,४०० रुपये होते. ते आता २,६५७ रुपयांना मिळत आहे. याप्रमाणे कणिक, साखर आदी अन्य आवश्यक वस्तूंच्याही किमती गगनाला भिडल्या आहेत. सिमेंटचेही दर वाढले आहेत. या साऱ्या प्रकारामुळे सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत.