युवानाद संघाला दामोदर क्रिकेट लीगचे जेतेपद

|
12th October 2021, 12:01 Hrs
युवानाद संघाला दामोदर क्रिकेट लीगचे जेतेपद

पणजी : क्रिशिव क्रिकेटर्स आयोजित स्व. दामोदर नाईक स्मृती चषक ‘दामोदर क्रिकेट लीग’ स्पर्धेत युवानाद संघाने विजेतेपद पटकाविले. त्यांना रोख बक्षीस व विजेत्याचा करंडक देण्यात आला.
सूरज इलेव्हन संघाला उपविजेतेपद मिळाले. त्यांना रोख बक्षीस व करंडक देण्यात आला. स्पर्धेतील वैयक्तिक बक्षिसे सुभाष शेट्ये (मालीकावीर), मांगिरीष वागळे (उत्कृष्ट फलंदाज), मनोज नार्वेकर (उत्कृष्ट गोलंदाज) व दिनेश गावकर (अष्टपैलू खेळाडू) यांना प्राप्त झाली.
स्पर्धेत एकूण सहा संघांनी भाग घेतला होता. रमन चोडणकर, रमेश नार्वेकर, समित शेट नार्वेकर, मेघा शेंगाळी व राजेंद्र मोरजकर यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. पुंडलीक बाले यांनी सूत्रसंचालन केले.