अमेरिकेत भूकंप; त्सुनामीचा इशारा!


30th July 2021, 09:57 am
अमेरिकेत भूकंप; त्सुनामीचा इशारा!

अमेरिकेत भूकंप; त्सुनामीचा इशारा!
वॉशिंग्टन :
अमेरिकेतील अलास्का पेनिनसुलात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. यामुळे हादर्‍यानंतर लोकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.२ इतकी मोजली गेली आहे. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात वित्तहानीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्यातरी कोणत्याच जीवितहानीचे वृत्त नाही. मात्र समुद्र किनार्‍यावरील शहरे आणि गावांना त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे.
अमेरिका जिओलॉजिकल सर्व्हेने रात्री ११ वाजून २५ मिनिटांनी ४६.७ किमी खाली भूकंपाच्या धक्क्यांची नोंद केली. यूएसजीएसच्या अंदाजानुसार कमीत कमी दोन धक्के यावेळी जाणवले. ६.२ आणि ५.६ रिश्टर स्केलचे हे धक्के होते.
अलास्का पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये येते. त्यात सीस्मिक अ‍ॅक्टिव्हीटी सक्रिय असते. उत्तर अमेरिकेत मार्च १९६४ मध्ये सर्वात मोठा भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ९.२ रिश्टर स्केल इतकी मोजली गेली होती. अँकोरेज, अलास्का खाडी, पश्चिम तटीय भाग आणि हवाई भागाला मोठा धक्का बसला होता. भूकंप आणि त्सुनामीमुळे २५० हून अधिक जणांना जीव गमवावा लागला होता.

हेही वाचा