मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर सद्गुरूंना दिल्ली रुग्णालयातून डिस्चार्ज

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
27th March, 06:46 pm
मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर सद्गुरूंना दिल्ली रुग्णालयातून डिस्चार्ज

नवी दिल्ली : १७ मार्च रोजी मेंदूच्या शस्त्रक्रियेनंतर सद्गुरूंना बुधवारी इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. नवी दिल्ली येथील हॉस्पिटलमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया करण्यापूर्वी त्यांना काही आठवड्यांपासून तीव्र डोकेदुखीचा त्रास होत होता.

अपोलो हॉस्पिटल ग्रुपच्या जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर डॉ. संगीता रेड्डी यांनी हॉस्पिटलमध्ये सद्गुरूंची भेट घेतल्यानंतर सांगितले की, बरे होत असतानाही सद्गुरूंनी तोच उत्साह कायम ठेवला आहे. जागतिक भल्यासाठी त्यांची बांधिलकी, त्यांचे कुशाग्र मन आणि त्यांची विनोदबुद्धी सर्व काही अबाधित आहे. त्यांच्या तब्येतीची चौकशी करणाऱ्या लाखो लोकांसाठी ही छान बातमी आहे.

डॉ. विनित सुरी, डॉ. प्रणव कुमार, डॉ. सुधीर त्यागी, डॉ. एस. चटर्जी आणि अपोलो हॉस्पिटल्सची संपूर्ण टीम त्यांच्या जगभरातील लाखो स्वयंसेवक आणि लोकांबरोबर एकजूट झाली.

सर्वांकडून सद्गुरूंना मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल ईशा फाउंडेशनने आभार मानले.