अर्थमंत्र्यांकडून मध्यमवर्गीयांना १२ लाखांची भेट!

केंद्रीय अर्थसंकल्प २०२५-२६मध्ये विविध घोषणा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
01st February, 11:32 pm
अर्थमंत्र्यांकडून मध्यमवर्गीयांना १२ लाखांची भेट!

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पात, अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी) करदात्यांना मोठा दिलासा दिला. १२ लाख रुपयांच्या वार्षिक उत्पन्नावर, म्हणजेच ज्यांचे वेतन दरमहा १ लाख रुपये आहे, त्यांना शून्य कर भरावा लागेल. १२ लाख ७५ हजार रुपये उत्पन्न असलेल्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. तथापि, जर तुमचा पगार एक रुपयानेही वाढला तर तुम्हाला १५ टक्के कर भरावा लागेल.


करदात्यांना हा फायदा मानक वजावट (स्टँडर्ड डिडक्शन) अंतर्गत मिळेल. गेल्या वर्षी मानक वजावटीची मर्यादा ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये करण्यात आली. अशा परिस्थितीत, जर पगार वार्षिक १२ लाख ७५ हजार रुपये असेल, तर शून्य कर भरावा लागेल. तथापि, जर तुमचा पगार १२.७५ लाख रुपयांपेक्षा एक रुपयाने जास्त असेल तर तुम्हाला १५ टक्के कर स्लॅबमध्ये ठेवले जाईल.

मानक वजावट ही अशी रक्कम आहे जी तुमच्या उत्पन्नातून थेट कापली जाते आणि उर्वरित पगारावर कर स्लॅबनुसार कर आकारला जातो. जर तुमचा वार्षिक पगार १० लाख रुपये असेल आणि त्यातून ५०,००० रुपयांची मानक वजावट केली असेल, तर फक्त ९,५०,००० रुपयांवर कर भरावा लागेल.


गेल्या वर्षी २०२४ मध्ये निर्मला सीतारामण यांनी नवीन कर प्रणालीमध्ये मानक वजावटीची मर्यादा वाढवून मोठी भेट दिली आणि ही मर्यादा ५० हजार रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली. एखाद्याचा पगार १ लाख रुपये असेल, तर नवीन कर स्लॅब अंतर्गत त्याची कर देयता ८० हजार रुपये आहे, परंतु १२ लाख रुपये आणि ७५ हजार रुपयांची मानक वजावट जोडल्यानंतर, १३ लाख रुपयांवरील कर फक्त २५ हजार रुपये होईल.

अशा प्रकारे लागणार उत्पन्नावर कर

  • जर तुमच्या १२.७५ लाख रुपयांच्या पगारावर एक रुपयाही वाढ झाली तर तुम्ही १५ टक्के कर स्लॅबमध्ये याल. नवीन कर प्रणालीमध्ये, १२ लाख ते १६ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना १५ टक्के कर आकारला जाईल.
  • ४ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर शून्य कर, ४ लाख ते ८ लाख रुपयांवर ५ टक्के कर, ८ लाख ते १२ लाख रुपयांवर १० टक्के कर, १२ लाख ते १६ लाख रुपयांवर १५ टक्के कर भरावा लागेल.
  • १६ लाख ते २० लाख रुपयांपर्यंतच्या कर रकमेवर २० टक्के कर, २० लाख ते २४ लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर २५ टक्के आणि २४ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर ३० टक्के कर आकारला जाईल. 


हेही वाचा