महाराष्ट्र : नाशिक-गुजरात मार्गावर भीषण दुर्घटना, २०० फुट खोल दरीत कोसळली लक्झरी बस

७ जण ठार तर १५ जखमी '

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd February, 11:43 am
महाराष्ट्र : नाशिक-गुजरात मार्गावर भीषण दुर्घटना, २००  फुट खोल दरीत कोसळली लक्झरी बस

नाशिक : महाराष्ट्रातील नाशिक-गुजरात महामार्गावर भीषण अपघात झाला. लक्झरी बस २०० फूट खोल दरीत कोसळली. रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ७ प्रवाशांचा मृत्यू झाला असून १५  जण जखमी झाले आहेत. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार चालकांचे नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली. ही बस नाशिकच्या सापुतारा घाटातून सुरतकडे जात असताना ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व जखमी प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. बहुतांश प्रवासी हे मध्य प्रदेशातील रहिवासी असून ते नाशिक येथील तीर्थक्षेत्रांना भेट देण्यासाठी आले होते. सध्या पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करत आहे.


बातमी अपडेट होत आहे. 

हेही वाचा