देशभरात समान टोल आकारणी होणार, नितीन गडकरींची माहिती

राष्ट्रीय महामार्गांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th February, 09:42 am
देशभरात समान टोल आकारणी होणार, नितीन गडकरींची माहिती

दिल्लीः केंद्रीय रस्ते वाहतूक अन् महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनचालकांच्यादृष्टीने महत्वाची बातमी दिली आहे. पुढील काही काळात देशभरात  एकसारखा टोल लागू करण्याबाबत काम सुरु असल्याची माहिती गडकरी यांनी एका मुलाखती दरम्यान दिली आहे. 

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांना आता यामुळे दिलासा मिळणार आहे. गडकरी म्हणाले की, आम्ही एकसमान टोल धोरणावर काम करत आहोत. यामुळे प्रवाशांच्या अडचणी कमी होणार आहे. 

राष्ट्रीय महामार्गांवर ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आधारित टोल संकलन प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे प्रवाशांना याचा खूप फायदा होणार आहे. या निर्णयामुळे देशात लवकरच सगळीकडे एकसमान टोल लागू होऊ शकतो. 

सध्या राष्ट्रीय महामार्गांवर ६० टक्के वाहने ही खाजगी आहेत. तर टोल वसूलीत त्यांना २०-६० टक्के वाटा आहे. त्यामुळे टोल आकारणी वाढली आहे. यामुळे प्रवाशांना जास्त त्रास होत असल्याचे गडकरी म्हणाले. 

 ५०-६० हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पावर काम सुरु होणार ः
पूर्वी मंत्रालयात ३००० कोटी रुपयांपर्यंतच्या महामार्ग प्रकल्पांना मंजुरी देण्याचा अधिकार होता.मात्र, आता मंत्रालय नवीन प्रकल्पाला मंजुरी देऊ शकत नाही. सध्या ५०-६० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प मंजुरीसाठी मंत्रिमंडळाकडे पाठवले असून लवकरच या प्रकल्पांवर काम सुरु होईल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा