केरळमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक!


30th July 2021, 09:53 am
केरळमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक!

केरळमध्ये करोनाचा पुन्हा उद्रेक!
तिरुअनंतपुरम :
केरळमध्ये करोनाची स्थिती गंभीर असल्याचे दिसून येत आहे. मागच्या तीन दिवसात केरळमध्ये करोनाची संख्या झपाट्याने वाढली आहे. देशाची करोनाची आकडेवारी पाहता केरळमधील करोना रुग्णसंख्या त्यात ५० टक्क्यांवर आहे. २६ जुलैला ११,५८६ रुग्ण होते. तर २८ जुलैला ही संख्या २२,०५६ इतकी झाली आहे.
करोनाचे वाढते रुग्ण पाहता केरळमध्ये ३१ जुलै आणि १ ऑगस्टला संपूर्ण लॉकडाउन जाहीर करण्यात आले आहे. केरळमध्ये मलप्पुरम, त्रिशूर, कोझिकोड, एर्नाकुलम, पलक्कड, कोल्लम, अलाप्पुझा, कन्नूर, तिरुवनंतपुरम आणि कोट्टायममध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये करोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ६ सदस्यीय टीम केरळमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. ही टीम राज्य सरकारसोबत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी उपाययोजना करेल, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी दिली आहे.

हेही वाचा