नागरी सेवेतील सहा ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या

राणे, कोठवाळे, कामत यांचा समावेश


22nd June 2021, 11:49 pm

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : अमरसेन राणे, श्रीनेत कोठवाळे, संध्या कामत यांच्यासह राज्य नागरी सेवेतील सहा ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या. कार्मिक खात्याचे अवर सचिव विशाल कुंडईकर यांनी या संदर्भातील आदेश जारी केला आहे.
राज्यपालांचे अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहणाऱ्या अमरसेन राणे यांची मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी बदली करण्यात आली आहे. श्रीनेत काेठवाळे यांची गृह खात्याचे अतिरिक्त सचिव म्हणून नेमणूक केली असून, या पदावर असलेल्या संध्या कामत यांची रवींद्र भवन, मडगावच्या सदस्य सचिव म्हणून बदली केली आहे. मडगाव रवींद्र भवनचे सदस्य सचिव असलेल्या मेघनाथ परोब यांची सार्वजनिक गाऱ्हाणी खात्याचे संचालक म्हणून, तर सुधीर केरकर यांची तुरुंग अधीक्षकपदी बदली झाली आहे. दक्षिण गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी ३ पदी असलेल्या गौरीश कुट्टीकर यांची दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी (सीईओ) बदली झाली आहे. उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे सीईओ गौरीश शंखवाळकर यांच्याकडे राज्यपालांचे संयुक्त सचिवपदाचा ताबा देण्यात आला आहे.