उत्तर प्रदेशात हजारो मुलांचे, महिलांचे धर्मांतरण


22nd June 2021, 01:02 am
उत्तर प्रदेशात हजारो मुलांचे, महिलांचे धर्मांतरण

उत्तर प्रदेशात हजारो मुलांचे, महिलांचे धर्मांतरण 

लखनऊ : 

उत्तर प्रदेशमध्ये हजारो मूकबधिर मुले आणि महिलांचे धर्मांतरण झाल्याचे समोर आले आहे. धर्मांतरण रॅकेटमध्ये मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात राहणार्‍यांचा सहभाग असून,  १ हजारापेक्षा जास्त लोकांचे त्यांनी धर्मांतर केले असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे.

नोएडातील मूकबधिर शाळेतील मुलांचंही धर्मांतरण त्यांनी केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी गोमतीनगर पोलीस ठाण्यात राज्यात लागू करण्यात आलेल्या धर्मांतरण विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इस्लामिक दवाह केंद्राचे अध्यक्षांचाही एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, या रॅकेटला परदेशातून पैसा पुरवला जात असल्याचे पुरावे पोलिसांकडे होते. दोघांनाही चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. आम्हाला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. यात परदेशातून पुरवल्या जाणार्‍या पैशांसंदर्भातील कागदपत्रांचाही समावेश आहे, असे प्रशांत कुमार यांनी सांगितले. 

------------

पैसे, नोकरी यांचे आमिष 

पोलिसांनी दोघांची चौकशी केली. वर्षभरात २५० ते ३०० मुलांचे धर्मांतर केले असल्याची माहिती त्यांनी दिली. लोकांना पैसे आणि नोकरीचे आमिष देऊन हे धर्मांतर करत होते. कल्याणपूर आणि कानपूर येथील दाम्पत्यांच्या मूकबधिर मुलाचे धर्मांतरण करण्यात आले.  त्यानंतर त्याला दक्षिण भारतात पाठवण्यात आले.  अशी हजारो प्रकरण समोर आली आहेत, असे प्रशांत कुमार म्हणाले.

---------------


हेही वाचा