Goan Varta News Ad

बेळगाव जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये २१ जूनपर्यंत वाढ

कर्नाटकातील ११ जिल्ह्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडून घोषणा

|
10th June 2021, 10:39 Hrs
बेळगाव जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये २१ जूनपर्यंत वाढ

बेळगाव : कर्नाटकातील ११ जिल्ह्यांतील लॉकडाऊन २१ जूनपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी जाहीर केला आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्याचाही समावेश आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी सायंकाळी हा निर्णय घोषित केला.
पालकमंत्र्यांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी तज्ज्ञांच्या समितीशीही चर्चा केली. बेळगावसह चिक्कमंगळुरू, दक्षिण कन्नडा, हासन, म्हैसुरू, कोडगू, बंगळुरू ग्रामीण, चामराजनगर, तुमकुरू, मंड्या आणि शिवमोग्गा या जिल्ह्यांमधील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यातील लॉकडाऊन १४ जून रोजी संपणार आहे. त्यानंतर या जिल्ह्यांना बाजारपेठ दुपारी २ वाजेपर्यंत खुले ठेवण्याची सूट मिळू शकते.
बेळगाव जिल्ह्याचा लॉकडाऊन वाढवल्याचे स्पष्टीकरण देताना उपमुख्यमंत्री गोविंद करजोल म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्याची सीमा बेळगाव जिल्ह्याला लागून आहे. या दोन्ही ठिकाणी सक्रिय बाधितांची संख्या अधिक आहे. बेळगावचा लॉकडाऊन वाढल्यामुळे गोव्यातील भाजीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.