दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयितांना अटक

सशयितांकडून दोन अॅक्टिवा जप्त


06th May 2021, 11:51 pm
दुचाकी चोरी प्रकरणी दोघा संशयितांना अटक

प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : पर्वरी पोलिसांनी दुचाकी चोरी प्रकरणात मूळ बिहार येथील आणि वेरे येथे राहणाऱ्या मोहम्मद अफोर्ज (३०) आणि लक्ष्मी मुखिया (२२) या संशयितांला अटक केली आहे. सशयितांकडून दोन अॅक्टिवा जप्त करण्यात आल्या आहेत.
पर्वरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी पिळर्ण येथील नितीन म्हालसेकर आणि नेरूल येथील बॅनी सिल्वेरा यांनी तक्रार दाखल केली आहे. नितीन यांच्या तक्रारीनुसार, २ मे रोजी रात्री ८ वाजता त्यांनी घरासमोर अॅक्टिवा दुचाकी उभी केली होती. दुसऱ्या दिवशी कामाला जाणासाठी सकाळी ७.३० वाजता दुचाकी पार्क केलेल्या ठिकाणी गेले असता, दुचाकी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. दुसरी तक्रार बॅनी यांनी दाखल केली आहे. यानुसार, बॅनी यांनी ४ रोजी दुपारी ३ वाजता घरी जेवायला आले असता, दुचाकी बाहेर पार्क केली होती. पोलिसांनी दोन्ही तक्रारींची दखल घेऊन भारतीय दंड संहितेच्या कलम ३७९ अंतर्गत एकत्र गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी वरील दोघा संशयितांना अटक करून दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. संशयितांना पोलिस कोठडीसाठी शुक्रवारी म्हापसा येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.