ईव्हीएमवर शंका नकोच... सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या व्हीव्हीपॅटशी निगडीत सर्व याचिका

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 01:52 pm
ईव्हीएमवर शंका नकोच... सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या व्हीव्हीपॅटशी निगडीत सर्व याचिका

नवी दिल्ली : ईव्हीएम-व्हीव्हीपॅटशी निगडीत सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने आज शुक्रवारी या संदर्भातील याचिकेवर निकाल दिला. खंडपीठाने २४ एप्रिल रोजी सर्व पक्षांचा युक्तिवाद ऐकून निर्णय राखून ठेवला होता. ईव्हीएमवर मतदारांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी व्हीव्हीपीएटी स्लिपची १०० टक्के मोजणी करण्यात यावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांच्या वतीने करण्यात आली होती. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान केलेल्या मतांशी व्होटर-व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल स्लिप जुळण्याबाबतच्या याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने जुनी पद्धतच कायम ठेवली आहे.ईव्हीएम-व्हीव्हीपॅट संदर्भातील सर्व याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या,  कोर्टाचं याबद्दल म्हणणं काय आहे? - BBC News मराठी

सुनावणी दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक गोष्टीवर अविश्वास दाखवता येणार नाही असे स्पष्ट केले होते. खंडपीठाने निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना ईव्हीएमशी निगडीत ५ प्रश्न उपस्थित केले होते. त्यात, ईव्हीएममध्ये बसवलेले 'मायक्रोकंट्रोलर' पुन्हा प्रोग्राम केले जाऊ शकते की नाही हा मुख्य प्रश्न होता. न्यायालयात हजर झालेले वरिष्ठ उपनिवडणूक आयुक्त नितीश कुमार व्यास यांनी यापूर्वी ईव्हीएमच्या कामकाजाबाबत न्यायालयात सादरीकरण केले होते. खंडपीठाने त्यांना २४ रोजी दुपारी दोन वाजता प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाने काही गोष्टींबाबत संभ्रम असून त्यावर स्पष्टीकरण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले होते.