युक्रेनमध्ये शांती ठेवण्यासाठी रशियात अभिनेत्रीची ‘न्यूड पार्टी’! कोर्टाने ठोठावला दंड

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th April, 12:43 pm
युक्रेनमध्ये शांती ठेवण्यासाठी रशियात अभिनेत्रीची ‘न्यूड पार्टी’! कोर्टाने ठोठावला दंड

टॅलिन : युक्रेनमध्ये शांती निर्माण करण्याचे आवाहन करण्यासाठी ‘न्यूड पार्टी’चे आयोजन करणाऱ्या टीव्ही प्रेझेंटर तथा अभिनेत्री अनास्तासिया इव्हलीवा हिला रशियन न्यायालयाने ५० हजार रूबल अर्थात (भारतीय चलनानुसार साधारण ४५ हजार रुपये) दंड ठोठावला आहे.

अभिनेत्रीला तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये युक्रेनमध्ये शांततेचे आवाहन करून लष्कराची बदनामी केल्याचा दंड ठोठावण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये तिने एका पार्टीचे आयोजन केल्यावर रशियात सामाजिक स्तरावर त्याचे पडसाद उमटले होते. अभिनेत्रीने न्यूड पार्टी आयोजित केली. त्यात सहभागी होणाऱ्यांना निर्वस्त्र होऊन येण्यास सांगण्यात आले होते.

रशियाने युक्रेनवर केलेल्या आक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात शांतता आणि संवादाचे आवाहन करणाऱ्या दोन सोशल मीडिया पोस्टसाठी अभिनेत्रीला दंड ठोठावला आहे. लष्कराची बदनामी करणाऱ्या टिप्पण्यांबाबत तसेच कायद्याचे उल्लंघन केल्याबद्दल न्यायालयाने तिला दोषी ठरवले आहे. विशेष म्हणजे ती पोस्ट केल्यानंतर अनेक दिवसांनी त्यासंदर्भातील कायदा मंजूर झाला होता.

लोकांनी टीका केली होती

मॉस्कोच्या नाईट क्लबमध्ये पार्टी आयोजित केल्यानंतर इव्हलीवा प्रसिद्धीच्या झोतात आली. तिनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रात पाहुण्यांना ‘ड्रेस कोड’ म्हणून जवळजवळ नग्न अवस्थेत येण्यास सांगितले होते. एक प्रसिद्ध रॅपरही अगदी कमी कपड्यांमध्ये दिसत होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लोकप्रतिनिधी, ब्लॉगर्स आणि इतरांनी अशा घटनेवर जोरदार टीका केली होती आणि युद्धात अडकलेल्या देशासाठी हे अशोभनीय असल्याचे म्हटले होते.

अभिनेत्रीने टीकाकारांना उत्तर दिले

दरम्यान, पार्टीच्या संयोजक नास्तासिया इव्हलीवा यांनी टीकाकारांना उत्तर दिले. ‘आम्ही सुंदर, सडपातळ पाश्चात्य मॉडेल्सकडे पाहतो. त्यांचे कौतुक करतो. ‘ती खूप सुंदर आहे, ती खूप चांगली आहे’, अशा प्रतिक्रिया देतो. पण, जेव्हा आमचे सुंदर आणि फिट कलाकार बाहेर येतात, तेव्हा सगळ्यांना झोंबते’, असे तिने म्हटले आहे.

हेही वाचा