महाराष्ट्रात कडक नियमावली; आजपासून अंमलबजावणी

महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याबाबत बुधवारी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे.

Story: मुंबई : |
22nd April 2021, 12:45 am
महाराष्ट्रात कडक नियमावली; आजपासून अंमलबजावणी

मुंबई : महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्याबाबत बुधवारी राज्य सरकारकडून नवी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व सरकारी कार्यालयांना १५ टक्के कर्मचाऱ्यांनाच परवानगी देण्याचे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यासोबतच, मुंबईमध्ये लोकलमधून सामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यासोबतच लग्नाबाबत आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसंदर्भात देखील राज्य सरकारकडून महत्वाचे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध २२ एप्रिल रोजी संध्याकाळी ८ वाजेपासून १ मे रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत लागू असणार आहेत.
* नव्या नियमावलीनुसार राज्य सरकार, केंद्र सरकार आणि स्थानिक प्रशासनाशी संबंधित सर्व सरकारी कार्यालये फक्त १५ टक्के कर्मचारी क्षमतेनेच कार्यरत राहतील. करोनाशी संबंधित अत्यावश्यक सेवांच्या कार्यालयांना यातून वगळण्यात आले आहे.
* लग्नसमारंभ फक्त एकाच हॉलमध्ये २ तासांमध्येच पूर्ण करावे लागतील. यासाठी एकूण २५ लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुटुंबाला ५० हजार रुपये दंड तर हॉलवर करोनाची परिस्थिती सामान्य होईपर्यंत बंदी घालण्यात येईल.
* बसेस सोडून सर्व खासगी प्रवासी वाहतूक पर्यायांना फक्त अत्यावश्यक कारणासाठीच प्रवासी वाहतूक करता येईल. त्यासाठी चालक आणि एकूण प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना प्रवासाची परवानगी असेल. हे नियम आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत वाहनांना लागू नसून, प्रवासी राहात असलेल्या शहरांनाच लागू असतील. आंतरजिल्हा किंवा जिल्हांतर्गत प्रवास अत्यावश्यक सेवा किंवा वैद्यकीय कारण किंवा अंत्यविधीसारख्या टाळता न येण्यासारख्या कारणासाठीच करता येईल. नियमभंग करणाऱ्यांवर १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल.
* खासगी बसमध्ये एकूण आसनक्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांना परवानगी असेल. उभ्याने प्रवास करण्यास मनाई असेल. खासगी बसेसला एका शहरात जास्तीत जास्त दोन थांबे घेता येतील. सर्व थांब्यांवर प्रवाशांच्या हातावर १४ दिवसांच्या क्वारंटाईनचा शिक्का मारण्यात येईल. हा शिक्का बस सेवा पुरवणाऱ्यानेच मारणे बंघनकारक आहे.

हेही वाचा