महाराष्ट्रात १५ दिवस टाळबंदीची शक्यता

- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून आज निर्णय शक्य

Story: मुंबई : |
21st April 2021, 01:02 am
महाराष्ट्रात १५ दिवस टाळबंदीची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात १५ दिवस कडक लॉकडाऊन होण्याचे संकेत मिळत आहेत. राज्यातील करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी कडक निर्बंध आवश्यक आहेत. यासंदर्भात मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत पुन्हा कडक लॉकडाऊनबाबत चर्चा झाली आहे. राज्यात पूर्ण लॉकडाऊन लावाला लागेल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. राज्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा, रुग्णांना बेड मिळत नाहीयेत, अशी परिस्थिती आहे. यामुळे महाराष्ट्रात पूर्ण लॉकडाऊन लावावाच लागेल. लवकरच त्यासंबंधी नियमावली जारी करण्यात येतील, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
राज्यात बुधवारी रात्री आठपासून संपूर्ण लॉकडाऊन लागू करावा, अशी विनंती सर्व मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. आता लॉकडाऊनसंदर्भातील शेवटचा निर्णय मुख्यमंत्री घेतील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.
..................................
राज्यातील लॉकडाऊन हा १५ दिवसांचा असू शकेल. तसेच सार्वजनिक वाहतूक पूर्णपणे बंद न करण्याच्या सूचनाही या बैठकीत दिल्या आहेत. मात्र, जिल्हाबंदी होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा