जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात : मोदी

देशातील करोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. आम्हाला देशातील वैज्ञानिकांचा अभिमान आहे. नव्या वर्षात भारतात दोन लसींना परवानगी मिळाली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले.

Story: दिल्ली : |
04th January 2021, 11:19 pm
जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम भारतात : मोदी

दिल्ली : देशातील करोना व्हायरस नियंत्रणात आणण्यासाठी जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम सुरू होणार आहे. आम्हाला देशातील वैज्ञानिकांचा अभिमान आहे. नव्या वर्षात भारतात दोन लसींना परवानगी मिळाली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले. सोमवारी राष्ट्रीय हवामान परिषदेच्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी वस्तू व सेवांच्या गुणवत्तेवर भर देण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय हवामान परिषदेबरोबरच पंतप्रधानांनी राष्ट्रीय पर्यावरणीय गुणवत्ता प्रयोगशाळेचे भूमिपूजन केले. यावेळी मोदींनी व्होकल फॉर लोकलचा नारा देत भारतीय वस्तू जगातील बाजारापर्यंत नेण्याचे आवाहन केले. आत्मनिर्भर भारताचा उल्लेख करत पंतप्रधानांनी नवे परिमाण निश्चित करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन लसींना परवानगी देण्यात आली असून, देशात लवकरच करोना लसीकरणाला सुुरुवात होत आहे. देशातील सेवा गुणवत्तापूर्ण असायला हव्यात. मग ते क्षेत्र सरकारी असो वा खासगी. वस्तू दर्जेदार हव्यात. आपली गुणवत्ता परिमाण हे निश्चित करणार आहे की, भारतीय बनावटीच्या वस्तूंची जगात किती मागणी वाढली आहे. पर्यावरणाच्या क्षेत्रात भारत आज जगाचे नेतृत्व करण्याच्या दिशेने जात आहे. पण, हवेची गुणवत्ता आणि कार्बन उत्सर्जन मोजण्याच्या साधनांसाठी आपल्याला दुसऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. यातही आत्मनिर्भर होण्यासाठी आपण मोठे पाऊल टाकले आहे, असे मोदी म्हणाले.

हेही वाचा