सांगेतील शेतकरी आंदोलनाला ‘आम आदमी’चा पाठ‌िंबा


04th January 2021, 12:48 am
सांगेतील शेतकरी आंदोलनाला ‘आम आदमी’चा पाठ‌िंबा

पणजी : सांगे येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आम आदमी पक्षाने पाठिंबा दर्शवला आहे. तसेच सरकरकडून लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन थांबवू नये, असा सल्लाही आंदोलक शेतकऱ्यांना दिला आहे.
डॉ. प्रमोद सावंत यांचे सरकार गोव्यातील जनतेच्या गरजा व आकांक्षा यांविषयी असंवेदनशील बनले आहे. ते केवळ दिल्लीतील स्वामींच्या हुकूमावरच चालतात. तसे नसते तर शेतकऱ्यांनी २२ डिसेंबर रोजी दिलेल्या निवेदनावर कार्यवाही केली असती. जेव्हा शेतकऱ्यांनी आंदोलन चालू केले, तेव्हाच हालचाली सुरू केल्या, असे पक्षाचे गाेवा संयोजग राहुल म्हांबरे यांनी म्हटले आहे. गरीब व पीडित शेतकरी काहीही करणार नाहीत. सरकार त्यांच्यावर जे काही थोपवेल त्या सर्व गोष्टी ते आंधळेपणाने मान्य करतील, असे समजून मुख्यमंत्र्यांनी त्या निवेदनाकडे दुर्लक्ष केले, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
हे सरकार फसवे असल्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून लिखित आश्वासन देण्याची मागणी शेतकऱ्यांनी करावी. उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनीही मुख्यमंत्र्यांच्या कारभाराला बळी पडू नये, असे म्हांबरे यांनी म्हटले आहे. तुम्ही नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री किती हेराफेरी करतात आणि किती वेळा खोटे बोलतात, हे तुम्हाला माहिती नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा. मुख्यमंत्र्यांना लेखी आश्वासने देण्यास प्रवृत्त करावे. - राहुल म्हांबरे, आप