पुलवामा हल्ल्याची पाककडून कबुली

दहशतवादाचे आम्हीच बळी असल्याचे पाकिस्तान जगाला सांगत असले तरी त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. पुलवामा हल्ल्याबाबतचा खुलासा पाकिस्तानच्या मंत्र्याने केला आहे. पुलवामा हे इम्रान खानच्या सरकारचे मोठे यश असल्याचा दावा पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केला.

Story: इस्लामाबाद : |
30th October 2020, 01:51 am
पुलवामा हल्ल्याची पाककडून कबुली
इस्लामाबाद : दहशतवादाचे आम्हीच बळी असल्याचे पाकिस्तान जगाला सांगत असले तरी त्यांचा खरा चेहरा आता उघड झाला आहे. पुलवामा हल्ल्याबाबतचा खुलासा पाकिस्तानच्या मंत्र्याने केला आहे. पुलवामा हे इम्रान खानच्या सरकारचे मोठे यश असल्याचा दावा पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी केला. पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी संसदेत गुरुवारी चर्चेत सहभागी झाले असताना हे वक्तव्य केले आहे. पुलवामा हल्ला हा इम्रान खान यांच्या नेतृत्वातील पाकिस्तान सरकारचे मोठे यश आहे. फवाद चौधरी यांच्या या वक्तव्यामुळे आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

बाजवा होते थरथरत!
दिल्ली : पाकच्या संसदेत एका खासदाराने अभिनंदन वर्धमान यांच्या सुटकेसंदर्भात उभय देशांमधील चर्चेदरम्यान पाक सैन्याचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा हे कसे थरथरत होते आणि घामाघूम झाले होते, हे विरोधी पक्षाच्या नेत्याने सांगितले. यावरून पाकमध्ये वाद सुरू आहे. तर हवाई दलाचे माजी प्रमुख बी. एस. धनोआ यांनीही याबाबत माहिती दिलीय. जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये भारतीय जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी संघटनेच्या तळावर हल्ला केला. त्याच्या २४ तासांनंतर पाकिस्तान आणि भारत यांच्यात हवाई संघर्ष सुरू झाला होता.
हेही वाचा