गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु, उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली होती.

Story: गांधीनगर : |
30th October 2020, 01:48 am
गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन

गांधीनगर : गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे गुरुवारी ९२ व्या वर्षी निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. परंतु, उपचारानंतर त्यांनी करोनावर मात केली होती. 

केशुभाई पटेल यांनी दोन वेळा गुजरातचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. १९९५ आणि १९९८ मध्ये ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले होते. परंतु, २००१मध्ये त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. दोन्ही वेळा त्यांना आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आला नव्हता. या व्यतिरिक्त त्यांनी गुजरातचे उपमुख्यमंत्रिपदही भूषवले होते. २००१ मध्ये केशुभाई पटेल यांच्या राजीनाम्यानंतर नरेंद्र मोदी यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली होती. २४ जुलै १९२८ मध्ये जुनागढ येथे केशुभाई पटेल यांचा जन्म झाला होता. त्यांनी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणून प्रवेश केला होता. त्यानंतर जनसंघ आणि भाजपासोबत ते मोठ्या काळासाठी जोडले गेले होते. केशुभाई पटेल हे दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जात होते. त्यांच्या निधनाप्रति अनेक नेत्यांनी आदरांजली वाहिली आहे.

      


हेही वाचा