मोदींकडून गुजरातमध्ये तीन प्रकल्पांचे उद्घाटन

Story: दिल्ली |
24th October 2020, 11:12 pm
मोदींकडून गुजरातमध्ये तीन प्रकल्पांचे उद्घाटन

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्ली येथून व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून गुजरातमधील शेतकरी कल्याण, आरोग्य सेवा आणि पर्यटन संबंधित तीन प्रकल्पांचे उद्घाटन केले. दिवसभरात राज्यातील शेतकऱ्यांना पाटबंधारे आणि शेतीविषयक कामांसाठी वीजपुरवठा करण्याच्या उद्दीष्टाने मोदींनी ‘किसान सूर्ययोदय योजना’ सुरू केली.
या व्यतिरिक्त, मोदींनी अहमदाबाद येथील यू.एन. मेहता कार्डिओलॉजी अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने ४७० कोटी रुपये खर्चून तयार केलेल्या बालरोग ह्रदयरोग रुग्णालयाचे उद्घाटन केले.
----बॉनतनस---
एक काळ असा होता की गुजरातमध्ये विजेची कमतरता होती. २४ तास वीज देणे हे एक मोठे आव्हान होते. सौर उर्जा उत्पादन आणि वापर या दोन्ही बाबतीत आज भारत जगातील आघाडीच्या देशांमध्ये आहे. गेल्या ६ वर्षात सौर उत्पादनाच्या बाबतीत हा देश जगातील पाचव्या स्थानावर पोहोचला आहे आणि सातत्याने पुढे जात आहे, असे मोदी म्हणाले.

अहमदाबादमधील प्रमुख तीर्थक्षेत्र जुनागड शहराजवळील गिरनार पर्वतावर मोदींनी २.३ किमी लांबीच्या रोप-वे प्रकल्पाचे उद्घाटनही केले. हा आशियातील सर्वात लांब मंदिर रोपवे असल्याचे म्हटले जाते. या दरम्यान, मोदींनी आपल्या संबोधनात रोप-वे प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर केल्याबद्दल विरोधकांना लक्ष्य केले.
पंतप्रधान म्हणाले की जर त्यांनी गिरनार रोप-वेच्या मार्गावर रस्ता अडविला नसता तर त्याचे काम वर्षानुवर्षे थांबले नसते. लोक आणि पर्यटकांना त्याचे फायदे फार पूर्वीपासून मिळू लागले असते. ते म्हणाले की एक देशवासी म्हणून अशा (गिरनार रोप-वे) सार्वजनिक महत्त्व असलेल्या दीर्घकालीन प्रकल्पांमुळे देशातील जनतेच्या नुकसानीबद्दल आपण विचार केला पाहिजे.

हेही वाचा