Goan Varta News Ad

मुंबई इंडियन्सकडून खेळणार अर्जुन तेंडुलकर?

'त्या' फोटोमुळे चाहत्यांमध्ये चर्चा

|
15th September 2020, 05:40 Hrs

मुंबई : आयपीएलच्या तेराव्या हंगामाला चार दिवसांनी सुरुवात होत आहे. १९ रोजी पहिलाच सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात होणार आहे. चारवेळा आयपीएल चॅम्पियन असणाऱ्या रोहित शर्माचा संघ पाचव्यांदा आयपीएल जिंकण्यास सज्ज आहे. यासाठी खेळाडूंनी कसून सरावाला सुरुवात केली आहे.
गेल्या महिन्यातच संपूर्ण संघ युएइमध्ये दाखल झाला. मात्र, मुंबई संघाच्या एका फोटोमुळे चाहते संभ्रमात आहे. या फोटोमध्ये मुंबईच्या खेळाडूंसोबत पूलमध्ये सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर दिसून आला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अर्जुन मुंबईकडून खेळणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. या फोटोनंतर अर्जुन मुंबई संघात सामिल झाल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. मात्र, अर्जुन संघात नाही तर नेट बॉलर म्हणून संघात सामिल झाला आहे. कारण नियमांनुसार, कोणताही संघ नवीन खेळाडू संघात सामिल करू शकत नाही, जोपर्यंत खेळाडू संघाबाहेर होत नाही. त्यामुळे अर्जुनला नेट बॉलर म्हणून संघात घेतले आहेत. अर्जुन मुंबईच्या फलंदाजांना गोलंदाजी करताना दिसेल.