जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदला अटक

दिल्ली दंगलीप्रकरणी मोठी कारवाई


14th September 2020, 07:38 pm

नवी दिल्ली : दिल्लीत फेब्रुवारीत झालेल्या दंगलीत कथितरित्या सामील असल्याच्या आरोपांखाली पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा जवाहरलाल नेहरू विद्यापीठा (जेएनयू)चा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद याला अटक केली. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने खालिदची ११ तास चौकशी केल्यानंतर त्याला अटक केली. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
दिल्ली दंगलप्रकरणी दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने २ सप्टेंबरला काही तास उमर खालिदची चौकशी केली होती. त्याआधी पोलिसांनी दंगलीशी संबंधित अन्य एका प्रकरणात उमर याच्याविरोधात यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने कट रचल्याप्रकरणी उमर याची चौकशी केली होती. पोलिसांनी त्याला मोबाइलही जप्त केला होता.
उमर खालिद हा सर्वात आधी २०१६ मध्ये जेएनयूमध्ये झालेल्या कथित राष्ट्रविरोधी घोषणाबाजी प्रकरणी प्रकाशझोतात आला होता. त्या प्रकरणातही त्याला अटक करण्यात आली होती. जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याच्यासह देशद्रोहाच्या प्रकरणात मुख्य आरोपींमध्ये सामील आहे.
५३ जणांचा झाला होता मृत्यू
सीएएच्या विरोधकांमध्ये आणि समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक झटापटीनंतर २४ फेब्रुवारी रोजी दिल्लीत दंगल भडकली होती. त्यात ५३ जणांचा मृत्यू झाला होता. तर जवळपास २०० जण जखमी झाले होते.
क्राईम ब्रांचकडूनही २ सप्टेंबरला चौकशी
दिल्ली दंगली प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचने २ सप्टेंबर रोजीही काही तास उमर खालिदची चौकशी केली आहे. त्याआधी पोलिसांनी दंगलीशी संबंधित आणखी एका प्रकरणात उमर खालिदविरोधात यूएपीए कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवला होता. दिल्ली पोलिसांच्या क्राईम ब्रांचनेही दंगलीचा कथित कट रचल्याप्रकरणी उमर खालिदची चौकशी केली होती. त्याचा फोनही जप्त केला होता. 

हेही वाचा