महान तत्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ

4. माहीत आहे??

Story: महेश दिवेकर |
04th September 2020, 06:05 pm
महान तत्वज्ञ, शिक्षणतज्ज्ञ

https://www.youtube.com/watch?v=Waq5rj4jpIk

-

youtube.com/watch?v=BfHHdAwty7g

-

सप्टेंबरच्या 5 तारखेला देशभर शिक्षकदिन साजरा करण्यात येतो. ज्या देशात शिक्षकाला मान व प्रतिष्ठा असते, तेथील प्रज्ञावंत माणसे शिक्षण क्षेत्रातच अधिकाधिक आढळून येतात. असे देशच सर्वांगीण प्रगती करू शकतात. समाजाला सुसंस्कृत करणारा शिक्षक हा देशाचा आधार आहे. त्यामुळे नागरिकांनी या पवित्र व्यवसायाचा सन्मान केला पाहिजे. प्रत्येक माणसाने विचार केला पाहिजे. नेत्यानेही विचार करून बोलले पाहिजे. कारण तो जे सांगतो, त्यावर हजारो लोक विश्वास ठेवतात, तोही स्वतः विचार न करता. डाॅ. सर्वेपल्ली राधाकृष्णन यांचे हे विचार. 

सर्वेपल्ली राधाकृष्णन हे आपल्या भारताचे पहिले उपराष्ट्रपती, दुसरे राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्‍ज्ञ. त्यांचा कार्यकाळ होता १९५२ ते १९६२. चेन्नई शहरापासून ईशान्येला ६४ किमी अंतरावरील तिरुत्तनी हा त्यांचा जन्म गाव. जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजीचा.

ते कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नव्हते. सत्याग्रह, तुरुंग या बाबी त्याच्या जीवनात नव्हत्या. महात्मा गांधीशी त्याचे संबंध होते. हे तत्वज्ञ म्हणून प्रसिद्ध होते. जगभर त्यांची तत्वज्ञान प्रसिद्ध होती. स्वातंत्रोदय काळी काँग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्णन यांच्याकडे गेले. त्यांना संविधानसभेचे सदस्य होण्यासाठी पाचरण केले. त्यांना राजकारणात रस नव्हता. संविधान सभेत येण्यापूर्वी काही वर्ष ते प्राचार्य होते. नंतर बनारस विद्यापीठाचे कुलगुरू.

पाश्चात्त्य जगताला भारतीय चिद्‌वादाचा तात्त्विक परिचय करून देणारा भारतावरच्या ब्रिटिश सत्ताकाळातला महत्त्वाचा विचारवंत म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. भारतीय तत्त्वज्ञानाचे भाष्यकार या त्यांच्या कार्याचे महत्त्व जाणून ऑक्सफर्ड विद्यापीठाने त्यांच्या नावाने 'राधाकृष्णन मेमोरियल बिक्वेस्ट' हा पुरस्कार ठेवला आहे. १७ एप्रिल १९७५ रोजी त्यांचे निधन झाले. 

१९५४ मध्ये त्यांना 'भारतरत्‍न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जो मरेपर्यंत शिकत राहतो. आपल्या विद्यार्थ्याकडूनही शिकणे हा कमीपणा मानत नाही, तोच खरा शिक्षक, असे ते म्हणत. 5 सप्टेंबर ही त्यांची जयंती. त्यानिमित्त आदरांजली.  

बोनस लिंक

https://www.youtube.com/watch?v=awH7qyf_aVY