Goan Varta News Ad

राष्ट्रपतींनी वाहिली अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली

|
16th August 2020, 09:55 Hrs
राष्ट्रपतींनी वाहिली अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली

नवी दिल्ली :
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांची रविवारी दुसरी पुण्यतिथी पाळण्यात आली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना अनेक केंद्रीय मंत्री व अन्य नेत्यांनीही त्यांचे स्मारक ‘सदैव अटल’वर जाऊन श्रद्धांजली दिली. वाजपेयी यांचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाले होते.
अमित शहा यांनी दिली श्रद्धांजली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रथमच ‘सुशासन’ क्रियान्वित होताना पाहिले. अटल बिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात देशात प्रथमच सुशासन पाहण्यास मिळाले. एका बाजूला त्यांनी सर्व शिक्षा अभियान, पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि राष्ट्रीय राजमार्ग विकास परियोजना सारखी विकासशी कामे केली तर दुसऱ्या बाजूला पोखरण परीक्षण व कारगिल विजय साजरा करत मजबूत भारताचा पाया ठेवला.