Goan Varta News Ad

माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन

|
16th August 2020, 08:20 Hrs
माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन

लखनौ : उत्तर प्रदेशचे गृहराज्यमंत्री आणि माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन झाले आहे. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हृदयविकारामुळे चेतन चौहान यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात उपचार सुरू होते. चेतन चौहान यांनाही करोना विषाणूची लागण झाली होती.

एका दिवसापूर्वीच ७३ वर्षीय चेतन चौहानची प्रकृती खालावली. त्याचे मूत्रपिंड निकामी झाले होते. ज्यामुळे त्यांना लाइफ सपोर्ट सिस्टमवर ठेवण्यात आले. जुलै महिन्यातच चेतन चौहानचा करोना विषाणूचा अहवाल सकारात्मक झाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेतन चौहान यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. क्रिकेटनंतर चेतन चौहानने राजकारणातील डाव सुरू केला. चेतन चौहान भारतीय राजकारणात सक्रिय भूमिका निभावत होते. चेतन चौहान हे भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे खासदारही राहिले आहेत. १९९१ आणि १९९८ च्या निवडणुकीत ते भाजपच्या तिकिटावर खासदार झाले. सध्या चेतन चौहान हे उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमध्ये मंत्री होते.