विवेकानंद ज्ञान मंदिरचा १०० टक्के निकाल

८७ टक्के गुणांसह खुशी शेटकर प्रथम

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
01st August 2020, 12:35 am
विवेकानंद ज्ञान मंदिरचा १०० टक्के निकाल

केरी-सत्तरी : येथील स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या विवेकानंद ज्ञान मंदिर हायस्कूलचा सलग दुसऱ्यांदा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला. खुशी प्रकाश शेटकर ८७ टक्के गुण घेऊन विद्यालयात पहिली आली. गेल्या वर्षी विद्यालयातून २० विद्यार्थी परीक्षेला बसले होते, तर यावर्षी २३ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
यंदा एक विशेष श्रेणीत, दहा प्रथम श्रेणीत, नऊ द्वितीय श्रेणीत व तीन उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले. संस्थेचे अध्यक्ष नामदेव गावस यांनी यावेळी आनंद व्यक्त केला. विद्यालय ग्रामीण भागात असून बऱ्याच सुविधांची कमतरता असून देखील या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कष्ट करून यश मिळवले आहे. शिक्षकवर्गानेही बरीच मेहनत घेतली व त्यामुळेच हे यश शक्य झाले आहे. सातत्याने प्रयत्न करीत राहिल्यास यश मिळे शकते, असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांनी सर्व शिक्षक, विद्यार्थी व त्यांच्या पालकांचे अभिनंदन केले. विद्यालयाच्या पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष लक्ष्मण गावस यांनी सांगितले की, आमच्या विद्यालयाचा शिक्षकवर्ग, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ आणि सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक जे परिश्रम घेतात त्याचे हे फळ आहे.
विद्यालयात ८७ टक्के गुण घेऊन खुशी शेटकर प्रथम, ७३ टक्के गुण घेऊन रुद्रेश गावस द्वितीय व ७२ टक्के गुण घेऊन उपेंद्र परब व वैभवी गावकर यांनी तृतीय स्थान पटकावले. अंकिता गावस, राहुल गावस, वैष्णवी नारुलकर, मनस्वी गावस, स्नेहा गावकर, सिया गावस, सलील शेटकर, गौरी गावकर, गोविंदराज माजिक, आकाश गावकर, संकल्प पारोडकर, अश्वेत गावस, सेजल गावस, संजना गवय, क्रिष्णा गावडे, सर्वेश सावंत, प्राची नाईक, ऋत्वेश शेट आणि विनिता सर्वणकर यांनी उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण होण्याचा मान प्राप्त केला. विद्यालयाच्या या यशाबद्दल सत्तरीतील ज्ञानसागर शिक्षण संस्था, साहित्य मंथन सत्तरी, हनुमान विद्यालय सत्तरी, श्रीराम विद्यालय सत्तरी, शांतादुर्गा सांस्कृतिक संस्था सत्तरी या संस्थांनी अभिनंदन केले आहे.