पणजी महापालिका निवडणुकीच्या ३० प्रभागांसाठी ७८ अर्ज; सतरा प्रभागांत दुरंगी लढतीची शक्यता

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पणजी महापालिका निवडणुकीच्या ३० प्रभागांसाठी  ७८ अर्ज; सतरा प्रभागांत  दुरंगी लढतीची शक्यता

पणजी : पणजी महापालिका (Corporation of The City of Panjim) निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज शेवटचा दिवस होता. आतापर्यंत ३० प्रभागांसाठी ७८ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. सतरा प्रभागांत  दुरंगी, नऊ प्रभागात तिरंगी, तीन प्रभागात चौरंगी लढतीची शक्यता आहे.

प्रभाग क्रमांक २६ मध्ये सर्वाधिक ५ उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. अर्जांची छाननी उद्या (बुधवार २५ फेब्रुवारी) रोजी होणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २६ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजेपर्यंत आहे. 

निवडणुकीत (Election) भाजप (BJP) समर्थित मंत्री बाबूश मोन्सेरात यांचे पॅनल आणि उत्पल पर्रीकर यांच्या ‘आमी पणजेकार’ यांच्या पॅनलमध्ये (Panel) थेट लढत होणार आहे. यापूर्वी बाबूश यांच्या पॅनलने तीसही प्रभागात उमेदवार दिले आहेत. आज दत्तप्रसाद नाईक यांनी ‘आमी पणजेकार’ने देखील ३० प्रभागात उमेदवार दिले असल्याचे सांगितले. उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. उमेदवारांचे  प्रस्तावक राहू नये; यासाठी दबाव येत असल्याचा आरोप नाईक यांनी केला.

याआधी महापौर रोहित मोन्सेरात यांनी विरोधक शेवटच्या दिवसांत सक्रीय होऊन केवळ टीकेचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता. बाबूश यांचे पॅनल विकासकामांच्या जोरावर निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

उत्पल पर्रीकर यांनी कॅसिनो मुळे पणजीत झालेल्या समस्यांना प्राधान्य देणार असल्याचे सांगितले होते. पारदर्शक प्रशासन आणि भ्रष्टाचारमुक्त पणजी हे ‘आमी पणजेकार’चे ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले होते. महापालिका निवडणुकीसाठी मतदान ११ मार्च रोजी होईल. तर १३ मार्च रोजी निकाल लागणार आहे.



हेही वाचा