
पणजी : ओल्ड गोवा (Old Goa) बायपास रस्त्यावर इको व्हॅन व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात (Accident) गंभीर जखमी झालेल्या मालतीदेवा चौहान (५१ वर्षे, खांडोळा, मूळ उत्तर प्रदेश) या महिलेचे इस्पीतळात (Hospital) निधन झाले. अपघातात चारजण जखमी झाले.
ओल्ड गोवा येथे रात्री उशीरा इको व्हॅनने (Van) हिरो शायन या मोटरसायकलला धडक दिली. त्यात मागे बसलेली महिला गंभीर जखमी झाली तर दुचाकी चालवणारा तिचा मुलगा जखमी झाला. या अपघातात इतर दोघे जखमी झाले. अपघातानंतर महिलेला गोवा वैद्यकीय महाविद्यालाय (गोमेकॉ) इस्पीतळात दाखल करण्यात आले.
मात्र, तिचे निधन झाले. याप्रकरणी ओल्ड गोवा पोलिसांनी इको व्हॅनचे चालक पंकज इक्का (डोंगरी, मूळ छत्तीसगड) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दत्तराज गावडे व हवालदार दिनेश मुळगावकर अधिक तपास करीत आहेत.
दरम्यान, अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करून वाहने हाकण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.