आमदार वीरेश, तुषार आझाद मैदानावरील आंदोलनात आज पुन्हा सहभागी होणार : मनोज परब

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
6 hours ago
आमदार वीरेश, तुषार आझाद मैदानावरील आंदोलनात आज पुन्हा  सहभागी होणार : मनोज परब

पणजी : कलम ३९ (३) विरोधात आणि आमदार (MLA) वीरेश बोरकर (Viresh Borkar) यांना फरफटत कार्यालयाबाहेर काढणाऱ्या पोलिसांवर (Police) कारवाई करण्यासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन आज मंगळवारी  ही सुरू आहे.

पणजीतील (Panjim) आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन करण्यात येत आहे. इस्पीतळात दाखल करण्यात आलेले आमदार वीरेश बोरकर व तुषार गावस आज सकाळी ११ वाजता या आंदोलनात सहभागी होणार आहेत.


आमदार बोरकर व गावस हे दोघेही आज ११ वाजता आझाद मैदानावरील आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती आरजी प्रमुख मनोज परब यांनी आपल्या ट्वीटवर खात्यावरून दिली. 

पणजीतील आझाद मैदानावर उपोषण करणारे आमदार वीरेश बोरकर व तुषार गावस यांना काल रात्री इस्पीतळात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून आंदोलन सुरू असून, काल सोमवारी या आंदोलनाने उग्र रुप घेतले.


पोलिसांना चकवा देत आंदोलनकर्त्यांनी दोनापावल येथील मंत्री विश्वजीत राणे यांच्या बंगल्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते. रात्री उशीरा पर्यंत आंदोलन सुरू होते. 

दरम्यान, सध्या हे आंदोलन गोव्यात सर्वत्र पसरले असून,  विविध स्तरातून या आंदोलनाला समर्थन मिळू लागले आहे. मोठ्या संख्येने लोक आंदोलनात सहभागी होऊ लागले आहेत. 

हेही वाचा