Goan Varta News Ad

डुकराच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देणार मदत

आडे-रिवण येथे सोमवारी डुकराच्या हल्ल्यात संतोष नाईक (५३) यांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरेने दखल घेतली असून, त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वन खात्याला आदेश दिले आहेत.

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
29th July 2020, 12:25 Hrs
डुकराच्या हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना देणार मदत

पणजी : आडे-रिवण येथे सोमवारी डुकराच्या हल्ल्यात संतोष नाईक (५३) यांचा मृत्यू झाला. या घटनेची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी त्वरेने दखल घेतली असून, त्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी वन खात्याला आदेश दिले आहेत.

एका खासगी भाटात काम करत असताना संताष नाईक यांच्यावर रानटी डुकराने झडप घातली होती. यावेळी झालेल्या झटापटीत नाईक यांचा मृत्यू झाला. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केले आहे. झालेल्या प्रकाराबाबत त्वरेने अहवाल द्या, असा वन खात्याला आदेश देत नाईक कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी आश्वस्त केले आहे.