विषप्रयोगाने तीन कुत्र्यांचा मृत्यू; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

डीएसपीसीएच्या तक्रारीनंतर म्हापसा पोलिसांचा शोध सुरू; करासवाडा, म्हापसा येथे तीन भटक्या कुत्र्यांचा विष घातल्याने मृत्यू झाल्याने म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police Station) अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात उत्तर गोवा जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक सोसायटीने (डीएसपीसीए) पोलिसांत तक्रार दाखल केली होती.(District Society for Prevention of Cruelty to Animals (DSPCA) North Goa).

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
14th November, 12:18 pm
विषप्रयोगाने तीन कुत्र्यांचा मृत्यू; अज्ञाताविरुद्ध गुन्हा

म्हापसा : करासवाडा, म्हापसा येथे तीन भटक्या कुत्र्यांचा विष घातल्याने मृत्यू झाल्याने म्हापसा पोलिसांनी (Mapusa Police Station) अज्ञाताविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. यासंदर्भात उत्तर गोवा जिल्हा प्राणी क्रूरता प्रतिबंधक सोसायटीने (डीएसपीसीए) पोलिसांत तक्रार दाखल केली होती.(District Society for Prevention of Cruelty to Animals (DSPCA) North Goa). 

शुक्रवारी ६ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आकय-करासवाडा पशुवैद्यकीय इस्पितळाजवळ तीन कुत्रे मृतावस्थेत आढळले होते. या कुत्र्यांना अज्ञाताने मुद्दामहून विष देेऊन मारल्याचे  डीएसपीसीएच्या अधिकारी अपूर्वा नाईक यांनी तक्रारीत म्हटले होते. 

भारतीय न्याय संहितेच्या कलम ३२५ तसेच प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा, १९६० मधील संबंधित तरतुदींनुसार या प्रकरणी गुन्हा नोंदवावा, अशी मागणी  या तक्रारीत पोलिसांकडे करण्यात आली होती. तसेच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्यासाठी संबंधित पशुवैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत तिन्ही कुत्र्यांचे शवविच्छेदन करण्यात यावे आणि त्यांचे विषवैज्ञानिक नमुने तपासणीसाठी पाठवण्यात यावेत, अशी विनंतीही संस्थेतर्फे केली होती.

पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक पुरावे जतन करावेत आणि या क्रूर कृत्यासाठी जबाबदार असणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असेही अधिकारी नाईक यांनी तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी म्हापसा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक पंढरी चोपडेकर अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा