पणजीः महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापन करण्याची मागणी करणारे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिणार. महाराष्ट्र परिचय केंद्र पणजी येथे होते. एखादी कोकणी अकादमी महाराष्ट्रात सुरू झाल्यास कोकणी लोक आणि साहित्यिकांना कोकणीसाठी चांगल्या पद्धतीने काम करायला मिळणार असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी सांगितले.
पुणे येथे अखिल भारतीय कोकणी परिषद आणि औद्योगिक तंत्र शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ३४ व्या अखिल भारतीय कोकणी अधिवेशनाच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सन्मानीय अथिती साहित्यिक अरुणा ढेरे, महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे, अखिल गोवा कोकणी परिषदेचे अध्यक्ष नंदगोपाल शणै, स्वागत समितीचे अध्यक्ष अश्विनी कुलकर्णी आणि अधिवेशनाचे कार्याध्यक्ष फादर आल्फी मोंतेरो उपस्थित होते.
महाराष्ट्रात कोकणी अकादमी सुरू झाल्यास तेथे राहणाऱ्या कोकणी समाजाला आणि कोकणी साहित्यिकांना भाषेच्या संवर्धनासाठी एक योग्य व्यासपीठ मिळणार. या उपक्रमाला महाराष्ट्र सरकारचा आधार मिळवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार. पण या मागणीसाठी महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींनी सुद्धा पुढाकार घेऊन सरकारवर दबाव आणण्याची गरज आहे, असे सावंत यांनी सांगितले.
महाराष्ट्र परिचय केंद्र पूर्वी पणजीत असल्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री सावंत यांनी या केंद्रावरून गावागावात मराठी चित्रपट आणि सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात येत होते, अशी आठवण करून दिली. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात कोंकणी अकादमी स्थापन झाल्यास तेथील कोकणी समाजाला आणि साहित्यिकांना कोकणी भाषेचे काम व्यापक प्रमाणात करण्यास आधार मिळणार, असे त्यांनी नमूद केले.
कोकणी ही केवळ गोव्याची भाषा नाही, तर मालवण ते कोची पर्यंत वेगवेगळ्या प्रदेशात बोलण्यात येणारी भाषा आहे. प्रदेशाप्रमाणे कोकणीचा उच्चार आणि बोली बदलते, पण या सर्वांना एकत्र ठेवणारा दुवा म्हणजे कोकणी भाषा. कोकणी ही आपली भाषा, वारसा आणि ओळख आहे. धर्म किंवा प्रांत वेगळे असले तरी कोकणी समाज एकत्र येणे गरजेचे आहे, असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
कोकणी भाषेचे संवर्धन करण्यासाठी सरकार तंत्रज्ञानाचा वापर, कोकणी शाळांना परवानगी, साहित्यिकांना पुरस्कार आणि विविध संस्थांना आधार देण्याचा प्रयत्न करीत आहे. कोकणी भाषेचे अस्तित्व आणि श्रीमंती पुढील पिढीकडे पोहोचवण्यासाठी घरांमध्ये कोकणी बोलणे गरजेचे असल्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ३४ व्या अधिवेशनात साहित्यिकांची चर्चासत्रे, पुस्तकांचे अनावरण आणि साहित्य सादरीकरणाचे कार्यक्रम दोन दिवस चालणार.


