उत्तर गोवा पीडीएच्या अध्यक्षपदी रोहित मॉन्सेरात यांची नियुक्ती

पणजीचे महापौर रोहित मॉन्सेरात यांची उत्तर गोवा नगर नियोजन प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर गोव्यातील ७ आमदार सदस्य म्हणून काम पहाणार आहेत. यामध्ये महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

28th September, 11:39 pm
उत्तर गोवा पीडीएच्या अध्यक्षपदी रोहित मॉन्सेरात यांची नियुक्ती

गोवन वार्ता प्रतिनिधी
पणजी
पणजीचे महापौर रोहित मॉन्सेरात यांची उत्तर गोवा नगर नियोजन प्राधिकरणाच्या (एनजीपीडीए) अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली उत्तर गोव्यातील ७ आमदार सदस्य म्हणून काम पहाणार आहेत. यामध्ये महसूलमंत्री बाबूश मॉन्सेरात, मत्स्योद्योगमंत्री नीळकंठ हळर्णकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे आणि उपसभापती जोशुआ डिसोझा यांचा प्रामुख्याने समावेश आहे.
यापूर्वी ताळगावच्या आमदार जेनिफर मॉन्सेरात या उत्तर गोवा पीडीएच्या अध्यक्ष होत्या. त्यांच्या निधनानंतर महापौर असलेले त्यांचे सुपुत्र रोहित मॉन्सेरात यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यामुळे उत्तर गोवा पीडीएचे अध्यक्षपद मॉन्सेरात कुटुंबाकडेच कायम राहिले आहे. या संदर्भातील अधिसूचना सरकारकडून जारी करण्यात आली असून, यापुढील उत्तर गोवा पीडीएच्या सर्व बैठका रोहित मॉन्सेरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडतील.
प्राधिकरणाची नवी समिती
अध्यक्ष : रोहित मॉन्सेरात (महापौर, पणजी)
सदस्य : बाबूश मॉन्सेरात (महसूलमंत्री), रोहन खंवटे (पर्यटनमंत्री), नीळकंठ हळर्णकर (मत्स्योद्योगमंत्री), जोशुआ डिसोझा (उपसभापती), केदार नाईक (आमदार), डिलायला लोबो (आमदार), कार्लुस फेरेरा (आमदार), सुशांत हरमलकर, आशीर्वाद खोजुर्वेकर, रूपेश कामत, सागर नाईक, गुरुदास शिरोडकर, पेद्रो कुतिन्हो, मारिओ फर्नांडिस. सदस्य सचिवपदी नगर नियोजन खात्याचे अधिकारी.
उत्तर गोवा पीडीएचे कार्यक्षेत्र
उत्तर गोवा प्राधिकरणाच्या अखत्यारीत पणजी, ताळगाव, बांबोळी आणि म्हापसा या महत्त्वाच्या भागांचा समावेश होतो. या भागात जमिनीचे भाव झपाट्याने वाढत आहेत. त्यामुळे ओडीपी, इमारतींचे आराखडे आणि झोन बदलण्याचे अनेक प्रस्ताव पीडीएसमोर येतात. यापूर्वी पीडीएने मंजुरी दिलेले अनेक प्रस्ताव वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे या प्राधिकरणाच्या बैठका आणि निर्णयांना मोठे राजकीय व सामाजिक महत्त्व असते.

हेही वाचा
सर्व पहा