गोवाभरातील ‘आप’-गोवा फॉरवर्डची होर्डिंग्ज गायब; गोवा फॉरवर्डची काँग्रेससोबत नव्या आघाडीच्या चर्चांना वेग

काँग्रेस-गोवा फॉरवर्ड-आरजीपी एकत्र येण्याची शक्यता; होर्डिंग्ज गायब झाल्याने राजकीय चर्चांना उधाण : गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (आप) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध ठिकाणी लावण्यात आलेली होर्डिंग्ज आता गायब झाली आहेत. आणि काँग्रेस, गाेवा फॉरवर्ड पार्टी आणि आरजीपी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यादृष्टीने बोलणी सुरू झाली आहेत.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
गोवाभरातील  ‘आप’-गोवा फॉरवर्डची होर्डिंग्ज गायब; गोवा फॉरवर्डची काँग्रेससोबत नव्या आघाडीच्या चर्चांना वेग

पणजी : गोव्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसत आहेत. आम आदमी पक्ष (आप) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (जीएफपी) यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विविध ठिकाणी लावण्यात आलेली होर्डिंग्ज आता गायब झाली आहेत. आणि काँग्रेस, गाेवा फॉरवर्ड पार्टी आणि आरजीपी एकत्र येणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. त्यादृष्टीने बोलणी सुरू झाली आहेत.

गोवा फॉरवर्ड पार्टी आणि आपने एकत्र येऊन लावलेल्या  होर्डिंग्जवर ‘काँग्रेस आणि भाजपने तुम्हाला दोनदा फसवले तिसऱ्यांदा; फसू देऊ नका’ असा संदेश देण्यात आला होता. त्याचबरोबर आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आणि गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई यांनी एकत्र येऊन ‘गोवा फर्स्ट’ची घोषणा करीत २०२७ ची विधानसभा निवडणूक एकत्र लढवण्याची घोषणा केली होती. मात्र, आता गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसची जवळीक वाढली आहे.

होर्डिंग्ज विविध ठिकाणांहून हटवण्यात आल्याने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः काँग्रेस आणि जीएफपीमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या घडामोडीकडे पाहिले जात आहे. काँग्रेसने यापूर्वीच जीएफपीसोबत आघाडी करण्यासाठी आपले दरवाजे नेहमीच खुले असल्याचे स्पष्ट केले होते. तसेच विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, काँग्रेस आणि जीएफपीसोबतच आरजीपीलाही सामावून घेण्याच्या दृष्टीने बोलणी सुरू आहेत. त्यामुळे काँग्रेस-जीएफपी-आरजीपी अशा व्यापक विरोधी आघाडीची नवी समीकरणे अस्तित्त्वात येत आहेत. मात्र, होर्डिंग्ज नेमकी कोणाच्या निर्देशाने हटवण्यात आली आणि त्यामागील राजकीय कारण काय, याबाबत अद्याप अधिकृत स्पष्टीकरण समोर आलेले नाही. त्यामुळे आगामी काळात कोणते पक्ष एकत्र येतात, याकडे गोव्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा
सर्व पहा