सांगे : सांगे येथील एका महिलेचा झुआरी नदीत अत्यंत कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. (Womans body found in zuari river at Sanvordem) नीला वेर्णेकर (वय ६८) असे मृत महिलेचे नाव आहे.
सावर्डे येथील मिराबाग पुलाखाली झुआरी नदीच्या पात्रात हा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कुडचडे अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मदतीने नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला.
त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय व कायदेशीर सोपस्कारांसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात (South Goa District Hospital, Margao) पाठवण्यात आला. महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, याबाबतची माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. शवचिकीत्सेनंतर अधिक माहिती उघड होणार असून, यासंदर्भात पोलीस अधिक तपास करीत आहेत.


