काणकोण येथे चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

चार दिवसांत राज्यात दुसरी घटना; परिसरात संतापाचे वातावरण

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
काणकोण येथे चार वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; एकाला अटक

काणकोण : म्हापसा येथे एका चार वर्षीय चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराला अवघे चार दिवस झाले असताना; काणकोण पोलीस स्थानक (Canacona Police station) हद्दीतही असाच प्रकार उघडकीस आला आहे. चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी काणकोण पोलिसांनी एका संशयिताला (मूळ बिहार) अटक केली आहे.  या घटनेमुळे संपूर्ण काणकोण परिसरात खळबळ उडाली आहे. नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

या प्रकरणी काणकोण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आणि मूळ बिहार येथील एका संशयिताला अटक केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. अवघ्या चार दिवसांत चार वर्षांच्या आणखी एका बालिकेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे बालसुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा प्रकरणांतील आरोपीला अटक करून जलद खटला चालवून फाशीची शिक्षा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

हेही वाचा
सर्व पहा