मनोज परब २२ रोजी करणार पुन्हा आरजीत प्रवेश

रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे (आरजीपी) माजी अध्यक्ष मनोज परब हे २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा पक्षात सामील होणार आहेत. (Revolutionary Goans Party RGP)

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
just now
मनोज परब २२ रोजी करणार पुन्हा आरजीत प्रवेश

पणजी : रिव्होल्युशनरी गोअन्स पार्टीचे (आरजीपी) माजी अध्यक्ष मनोज परब हे २२ नोव्हेंबर रोजी पुन्हा पक्षात सामील होणार आहेत. (Revolutionary Goans Party RGP)

पक्षाचे सरचिटणीस विश्वेश नाईक यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. मनोज परब यांनी पाच महिन्यांपूर्वी राजीनामा दिला होता. त्यांनी अध्यक्षपद, संस्थापक सदस्यत्व आणि प्राथमिक सदस्यत्व सोडण्यासोबतच सक्रिय राजकारणातूनही निवृत्ती जाहीर केली होती. पक्षांतर्गत मतभेद, गटबाजी आणि सत्ताकेंद्रित राजकारण ही त्यांनी पक्ष सोडण्यामागची कारणे दिली होती.

सांत आंद्रेचे आमदार विरेश बोरकर यांनी आपलीच आरजी कायदेशीर असल्याचा दावा करीत नवीन समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत त्यांची युतीसाठी काँग्रेसची बोलणी सुरू आहेत. खरा व कायदेशीर आरजी पक्ष कोणाचा? याबाबत वाद सुरू असतानाच मनोज परब हे पुन्हा आरजीत प्रवेश करणार आहेत. 

हेही वाचा
सर्व पहा