नरकासुर पहायला गेलेली तरुणी बेपत्ता; हणजूण पोलिसांनी नोंदवला गुन्हा

साळगाव येथे नरकासुर पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेली १९ वर्षीय तरुणी घरी परतलीच नसल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून हणजूण पोलिसांनी (Anjuna Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
9 mins ago
नरकासुर पहायला गेलेली तरुणी बेपत्ता; हणजूण पोलिसांनी नोंदवला गुन्हा

हणजूण : साळगाव येथे नरकासुराच्या प्रत‌िमा पाहण्यासाठी मैत्रिणीसोबत गेलेली १९ वर्षीय तरुणी घरी परतलीच नसल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तरुणीच्या वडिलांनी अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. त्यावरून हणजूण पोलिसांनी (Anjuna Police) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही तरुणी ७ नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ९ वाजता मैत्रिणीसोबत साळगाव येथे नरकासुराच्या प्रतिमा पाहण्यासाठी गेली होती. मात्र, त्यानंतर ती घरी परतली नाही. तिचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने वडिलांनी पोलिसांत धाव घेतली.

अज्ञात व्यक्तीने बळाचा वापर करून  फसवणुकीने मुलीच्या इच्छेविरुद्ध तिला पळवून नेल्याचा संशय वडिलांनी तक्रारीत व्यक्त केला आहे. या तक्रारीच्या आधारे ९ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री १२.५९ वाजता हणजूण पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी अधिक तपास हणजूण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक साईश किनळेकर वरीष्ठांच्या मार्गदर्शनखाली करीत आहेत.


हेही वाचा
सर्व पहा