म्हापसा : दिवाळीच्या दिवशी म्हापसा येथे चार वर्षांच्या मुलीवर कथित लैंगिक अत्याचार झाल्याची घटना रविवारी रात्री उघडकीस आली. पीडित मुलगीची प्रकृती गंभीर असून तिला उपचारार्थ गोवा वैद्यकीय इस्पितळात पाठवण्यात आले आहे. अज्ञात संशयिताचा शोध पोलीस घेत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, टॅक्सी स्थानकाजवळील एका जुन्या इमारतीतून विवस्त्र अवस्थेत पीडित मुलगी रडत बाहेर आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. एका जागरूक नागरिकाचे लक्ष या मुलीकडे गेल्यावर त्यांनी तिला तातडीने मदतीसाठी गाठले. स्थानिक नागरिकांनी त्वरित पोलिसांना याची माहिती दिली.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही मुलगी फुगे विकणाऱ्या कुटुंबातील असून म्हापसा बाजारात हे कुटुंब दिवाळीसाठी फुगे विकण्यासाठी आले होते. तिथून संशयिताने तिला उचलून घटनास्थळी जीर्ण इमारतीमध्ये आणले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणी आणि उपचारांसाठी तातडीने म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल केले असता तिची रवानगी गोमेकॉत करण्यात आली.
दरम्यान, म्हापसा पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अज्ञात आरोपीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
बातमी अपडेट होत आहे.


